चंद्रपूरात विदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी, दोन निगेटिव्ह

261

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर:- चंद्रपूरमध्ये आतापर्यंत विदेशातून आलेल्या दहा नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे़. त्यामधील दुबईवरून आलेले दोघे निगेटिव्ह आढळले आहेत़. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप कोणत्याही करोनाग्रस्त रूग्णाची नोंद नाही़. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे़. जिह्यातील सर्व विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहेत़. हे कोरोनान्टाइन ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहेत़. या सर्व उपाययोजनांच्या परिस्थितीचा पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे सोमवारी नियोजन भवनामध्ये आढावा घेणार आहेत़. जिल्हा कारागृहात जनजागृती शिबिर घेण्यात आले़.