Home नागपूर दोन नीलगायींना अज्ञात वाहनांनी दिली धडक

दोन नीलगायींना अज्ञात वाहनांनी दिली धडक

0
दोन नीलगायींना अज्ञात वाहनांनी दिली धडक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर:- कोंढाळी परिसरात पाण्याच्या शोधात असलेल्या दोन नीलयागना अज्ञात वाहनांनी धडक दिली़. यात दोन्ही वन्यजीवांचा मृत्यू झाल्याच्या घटना शनिवारी खापरी आणि रिंगणाबोडी शिवारात समोर आल्या़. कोंढाळी परिसरातील खापरी शिवारात रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग ओलांडणा-या नीलगाय (नर)ला एमएच २७ बीई ०२४५ या कारने धडक दिली़. यात नीलगाय जागीच ठार तर कार अनियंत्रीत होऊन रस्ता दुभाजकावर धडकली़ दुसरी घटना रात्री साडेतीन वाजता दरम्यान चमेली कक्षातील रिंगणाबोडी शिवारात घडली़. अज्ञात वाहनाने नीलगायीला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला़. याविषयीची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एफ़. आऱ. आझमी यांना कळताच सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश डाखोळे, दिलीप ढवळे यांच्यासह कर्मचा-यांनी दोन्ही घटनांचा पंचनामा केला़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here