नागपुरमध्ये ५ कोरोना संशयित रुग्णालयातून बेपत्ता

226

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर – नागपुरमध्ये ५ कोरोना संशयित रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत. हे पाचही जण नागपूरात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांना शासकीय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज यांचा चाचणी अहवाल आज येणार होता. तत्पूर्वीच हे पाचही जण काल मध्यरात्री रुग्णलायतून बेपत्ता झाले. रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान पोलिसांनी सांगितले की, पळून गेलेल्यापैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरित जणांचे रिपोर्ट येणार आहेत. आम्ही त्यांचा शोध घेतला असून लवकरच त्यांना रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करणार आहोत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपुरातील कोरोना संशयितांवर आता पहारा ठेवण्यात येणार आहे. नागपुरातील शासकीय रुग्णालयात ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आणि संशयितांना ठेवण्यात येते, त्या वॉर्डाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल अशी माहिती नागपूर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे