Home नागपूर गडचिरोली जिल्ह्यात जाणारा मद्यसाठा जप्त, दोघे आरोपी ताब्यात

गडचिरोली जिल्ह्यात जाणारा मद्यसाठा जप्त, दोघे आरोपी ताब्यात

148 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर – दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जाणारा ७८ हजार ३६० रूपयांचा मघसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला़ याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे़.
गडचिरोली जिल्ह्यात मद्यसाठा पुरविला जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली़ या माहितीच्या आधारावर गरीब नवाब चौक खरबी परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली़. मद्यसाठ्यासह वाहन असा एकूण ३ लाख ७८ हजार ३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़. अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़. चारचाकी गाडीच्या डिक्कीत मघसाठा ठेवण्यात आला होता़ विदेशी मद्याच्या ७५० मिलीलिटरच्या १२ बाटल्या, १८० मिलीलिटरच्या २८८ बाटल्या, ९० मिलीलिटरच्या २०० बाटल्या, स्टरलिंग बी-सेव्हनच्या १८० मिलीलिटरच्या ९६ बाटल्या जप्त करण्यात आल्या़. गोधनी येथील संदीप कोवे, मोहननगर येथील मनीष परगीडवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे़. कारवाईत दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, सहायक उपनिरीक्षक प्रशांत येरपुडे, राहुल पवार, सोनाली खांडेकर, वाहन चालक रवी निकाळजे यांचा समावेश आहे़ निरीक्षक रावसाहेब कोरे पुढील तपास करीत आहे़.