Home चंद्रपूर तिसरी कोलाम परिषद रद्द

तिसरी कोलाम परिषद रद्द

70 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर – महाराष्ट्र सरकारच्या आवाहनानंतर करोना विषाणू संसर्गाचा प्रभाव लक्षात घेता जिवती तालुक्यातील रायपूर खडकी येथे आयोजित करण्यात आलेली तिसरी कोलाम परिषद तातडीने रद्द करण्यात आली आहे.  या परिषदेची नवी तारिख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयोजन समितीने म्हटले आहे. येत्या १५ मार्चला या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते माणिकगड पहाडावर वास्तव्यात असलेल्या आदिम कोलामांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न म्हणून कोलाम विकास फाउंडेशन या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. या सोहळ्यात परिसरातील हजारो कोलाम एकत्र येऊन आपल्या समस्या मांडतात कोलामी संस्कृतीचे प्रदर्शनही यावेळी घडविले जाते. कोलाम विकास फाउंडेशनचे हा कार्यक्रम तूर्तास रद्द करून लवकरच कार्यक्रमाची पुढची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे आयोजन समितीच्यावतीने सचिव मारोती यांनी सांगितले आहे.