Home चंद्रपूर वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार

वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार

119 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील इतर बफर झोनमधील नलेश्वर मोहाडी येथे पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला करून ठार मारले. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. माणिक जगन नन्नावरे (५५), असे त्यांचे नाव आहे. चालू वर्षातील व्याघहल्ल्यांची ही सातवी घटना आहे. मागील वर्षभरात वन्यजीव हल्ल्यात २३ बळी गेले आहेत. नलेश्वर मोहाडी हे गाव सिंदेवाही तालुक्यात येते. माणिक हे उन्हाळी धानाची रोवणी झाल्यानंतर पाणी देण्यासाठी शेतावर गेले होते. परत येत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने पाणव्याजवळ अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात माणिक हे जागीच ठार झाल.े वाघाने त्याना घटनास्थळापासून जवळच असलेल्या विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या कालव्याजवळ नेले. बराच वेळ होऊनही माणिक हे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता कालव्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. गावकर्यांकडून माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतकाच्या नातेवाइकांना तातडीची २५ हजारांची रोख व ४ लाख ७५ हजार रूपयांचा धनादेश देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

बफरमधील तिसर्यांदा हल्ला
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर सीमेवर असलेल्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील कोलारा येथील एका शेतात १४ फेबु्रवारीला जागलीसाठी गेलेल्या एका शेतकर्यावर हल्ला करून वाघाने ठार केले होते.
त्यानंतर मूल तालुक्यातील पेटगाव येथे एका शेतात २४ फेबु्रवारीला काम करीत असलेल्या महिलेचाही बळी गेला होता. त्यानंतर बफमधील तिसरा व्याघ्रहल्ला आहे.