अवकाळी पावसामुळे पिकांना तडाखा

269

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,  गोंदिया

 गोंदिया/भंडारा – होळी आणि रंगपंचमीला अवकाळी पावसामुळे

शेतक-यांच्या हाती आलेले पीक गमवण्याची वेळ आली आहे़ यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्येचे वातावरण असून पिकांचे तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे़.

रंगपंचमीचा उत्साह सर्वत्र साजरा होत असताना गारपिटासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतपिकांची मोठी हानी झाली आहे़. सध्या रब्बी पिकांची कापणी झाली असली तरी अद्यापही त्यांची मळणी झालेली नाही़. कापणी झालेले रब्बी पीक शेतात जमा केलेले आहेत़. उन्हाळ्याचे दिवस आसल्याने शेतकºयांनी जमा केलेल्या पिकावर काहीही झाकले नव्हते़ मात्र अवकाळी पावसाने जमा केलेले पीक आले झाले असून त्यांना अंकुर फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ वरूणराजा शेतक-यांवर कोपला काय ? असा चिंताग्रस्त सवाल उपस्थित होत आहे़.