गोंदियात करोना विषाणू संशयित एक रूग्ण आढळला

202

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात करोना विषाणू संशयित एक रूग्ण आढळला आहे़. येथील एक २० वर्षीय मुलगी शिक्षणासाठी इजिप्तमध्ये गेली होती़ करोना थैमानामुळे ३ मार्च रोजी ती गोंदिया शहरात परत आली़ त्यानंतर तिला अस्वस्थ वाटत असल्याने काही चाचण्या केल्या़ चाचण्या तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्या आहे़. सध्या तिच्यावर घरीच प्राथमिक उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. व्ही़. पी़. रूखमोडे यांनी दिली़.