Home चंद्रपूर ताडोबा अभयारण्यात आलेल्या पर्यटकांची तपासणी

ताडोबा अभयारण्यात आलेल्या पर्यटकांची तपासणी

90 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर – ताडोबात येणा-या विदेशी पर्यटकांना प्रकल्पात प्रवेश बंदी नाही, पण त्यांची स्क्रीनिंग तपासणी केली जात आहे़ प्रतिबंध घालण्यासंदर्भात शासन विचार करीत आहे़ पण तूर्त प्रतिबंध नसला, तरी त्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची पुष्टी त्यांनी जोडली़ करोनाचा कुणीही संशयित अथवा बाधित रू ग्ण चंद्रपूर जिह्यात नाही़ त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये़ नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये मात्र काळजी घ्यावी असे आवाहन केले़ चंद्रपूर जिह्यातील जिल्हा सामान्य रूग्णालय व शासकीय वैघकीय महाविद्यालय येथे आठ खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे़ जिह्यात ११ मार्चपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली़.