
- सात महिलांना संधी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल
अर्जुनी मोरगाव/ प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने निर्देशानुसार आज (ता.१३) पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथील सभागृहात सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यामध्ये आरक्षण खालील प्रमाणे जाहीर झाले.
अनुसूचित जाती-२
अनुसूचित जमाती-३
नामप्र ४
सर्वसामान्य ५ अशा पध्दतीने जातीनिहाय आरक्षण काढून संवर्ग निहाय सोडत काढण्यात आली, यामध्ये गोठणगाव अनुसूचित जाती (महिला) राखीव
महागाव-अनुसूचित जाती तर
अनुसूचित जमाती करिता
माहुरकुडा – महिला
इटखेडा – महिला
अरूंननगर
नामाप्र करिता ४ जागा आरक्षित झाल्या त्यात
नवेगाव – नामाप्र – सर्वसाधारण
बाराभाटी – नामाप्र-महिला
झाशीनगर – नामाप्र -सर्वसाधारण
भिवखिडकी- नामाप्र -महिला
बोडगाव/देवी – महिला
निमगाव – सर्वसाधारण
केशोरी -सर्वसाधारण
भरणोली – सर्वसाधारण
ताडगाव – महिला
अशा पद्धतीने आरक्षण सोडत करण्यात आली
यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनूले, अप्पर तहसीलदार चिचगड निवृत्ती उईके, नायब तहसिलदार सुनील भानारकर, नायब तहसिलदार मुनेश्वर गेडाम खंड विकास अधिकारी मयूर आदेलवांड तसेच विविध पक्षाचे तालुका अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

