जन विकासाच्या महिला कामगारांनी जिल्हाअधिकारी कार्यालय समोर केले आंदोलन

221
  • कंत्राटी कामगार महिलांवर लाठीमार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर – जन विकासाच्या महिला कामगारांनी आक्रमक होत गुरूवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर रस्त्यावर झोपून आंदोलन केले. दरम्यान या महिला कंत्राटी कामगार करण्यासाठी आक्रमक झाल्याने बळाचा वापर करून पोलिसांनी लाठीमार करीत आंदोलन चिरडल्याचा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालयाने कंत्राटदारांना काळया यादीत न टाकल्याने कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. वैद्यकीय मंत्र्यांनी ३ मार्चच्या बैठकीत कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. ७ मार्चला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने दोन्ही कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले. परंतु आंदोलनकर्त्यांना कळविले नाही, असा आरोप आंदोलकांनी केला करोनाच्या संवेदनशील परिस्थितीमध्ये व्यवस्थापन व वैद्यकीय शिक्षण विभागाने बेजबाबदारपणा केल्याने आंदोलन सात दिवस लांबले परिणामी महिला कामगारांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर रस्त्यावर झोपून आंदोलन केले. त्यांना नियंत्रणात आणताना पालिसांनी आंदोलन चिरडण्यासाठी लाठीमार केला यात तारा ठमके, शेवंता भालेराव या महिला कामगार जखमी झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.