Home क्राइम जगत दारु अड्ड्यावर छापा टाकून दोन भावांना अटक

दारु अड्ड्यावर छापा टाकून दोन भावांना अटक

0
दारु अड्ड्यावर छापा टाकून दोन भावांना अटक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर – पाचपावली पोलिसांनी दारु अड्ड्यावर छापा टाकून दोन भावांना अटक केली. राहुल ऊर्फ रवी अशोक निनावे (वय ३५) व चंदू अशोक निनावे (वय ३१, दोन्ही रा. पाचपावली) ही अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघेही अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. सुरोशे, हेडकॉन्स्टेबल प्रेमदास वर्धे, शिपाई विश्वास, सचिन, दिनेश, चेतन व स्वाती मोहोड गस्त घालत होते. निनावे बंधू अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दारु अड्ड्यावर छापा टाकून दोघांना अटक केली. दोघांकडून देशी दारुच्या साठ्यासह हातभट्टीची दारु जप्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here