धुळवडीच्या दिवशी चारही जण बुडाले

236

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर – चंद्रपूर धुळवडीच्या दिवशी रंग खेळून झाल्यानंतर पोहायला गेलेल्या तिघांचा तर वैनगंगा नदी पार करताना एकाचा बुडून मृत्यू झाला़ चंद्रपूर जिह्यात मंगळवारी या चार घटना घडल्या़ तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे़.
गोंडपिपरीजवळील वढोली-विठ्ठलवाडा रस्त्याचे बांधकाम सुरू आहे़ त्याकरिता लागणा-या मुरूमाकरिता सुमारे एक किमी अंतरावर मोठा खड्डा खोदला आहे़ अवकाळी पावसामुळे या खड्डयात पाणी साचले आहे़. रंग खेळून झाल्यानंतर गावातील आकाश मोगरे (११) हा पाच मित्रासंह पोहायला गेला़. तिद्यांनी आंघोळीसाठी खड्डयात उड्या मारल्या़. काही वेळानंतर दोघे बाहेर गेले़ आले.  पण, संस्कार सात फूट खोल खड्डयात बुडाला़ मित्रांनी तातडीने गावक-यांना माहिती दिली़ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले़. त्यानंतर पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला़ दुसरी घटना पोंभूर्णा येथे घडली़. रंगोत्सवानंतर सायंकाळी अखिल दिवाकर कामीडवार (२७) हा युवक मित्रांसह गावाजवळून वाहणा-या अंधारी नदीवर गेला़ खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला़. मूळचे कवठी येथील कामीडवार कुटुंबीय मागील काही दिवसापांसून पोंभूर्णा येथे भाड्याने राहतात़.
वरोरा शहरातील अंकित पिंपळशेंडे (२६) हा सरदार पटेल वाँर्डातील युवक वर्धा नदीत बुडाला़ धुळवडीनंतर सात मित्र मारडाजवळून वाहण्या-या वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेले होते़ पण, अंकित खोल डोहातील लाकडांमध्ये अडकल्याने बाहेर येऊ शकला नाही़ बुधवारी सकाळी मासेमारांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला़ चौथी घटना ब्रह्मपुरीपासून १४ किमी अंतरावरील खरकाडा येथे घडली़. वैनगंगा नदीतून गावाकडे जात असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची माहिती आहे़. त्याचा शोध घेतला जात आहे़.