जुन्या भांडणाच्या राग, मनात घेऊन गावी आल्यावर केली हत्या

518

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया :- होळी करायला आपल्या गावी आलेल्या एका मजुराने आपल्या दोन साथीदारा सोबत रंगपंचमीच्या रात्री निलेश धनसिंह लिल्हारे रा. बिंझली याची जुन्या भांडणाचा मनात राग धरून हत्या केली. असुन तिन्ही आरोपीला सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यापासुन १२ किमी अंतरावर येणा-या बिंझली गावातील मृतक निलेश धनसिंह लिल्हारे व आरोपी पन्नालाल भरतलाल लिल्हारे हे दोघे हि मागील ४ महिन्यापासुन हैदराबाद येथे एका कंस्ट्रक्शन कंपनी मध्ये काम करत होते मात्र एका साईटवर मजदुर चे काम करत असतांना नीलेश व पन्नालाल यांच्या मध्ये भांडण झाले होते. भांडणा मध्ये निलेश ने पन्नालाल ला मारपीट करून पळुन गावी पळत आला होता. त्या मध्ये पन्नालाल च्या चेह-याच्या एका भागाला फॅक्चर सुद्धा झाला होता. पंन्नालाल हा होळी सणा निमित्त गावी आला होता मात्र जुन्या भांडणाचा राग मनात असल्याने आरोपीं पन्नालाल याने प्रवीण ढेकवार व प्रकाश भरतलाल लिल्हारे या आपल्या दोन मित्रांबरोबर मृतक निलेस याला गावच्या चौकात दि. १० मार्च मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास अडवून त्याच्या डोक्यावर काठीने मारहाण केली व त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात तीन्ही आरोपींना सालेकसा पोलीसांनी अटक केली असुन फिर्यादी सुनील धनसिंह लिल्हारे यांच्या तक्रारीवरून पकडण्यात आलेल्या आरोपिं विरूध्द कलम ३०२ हत्या, १२० (ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.