Home कृषिसंपदा पीक नुकसानीची रक्कम पंधरा दिवसात जमा होणार, बँक व्यवस्थापकाने दिल्ली हमी

पीक नुकसानीची रक्कम पंधरा दिवसात जमा होणार, बँक व्यवस्थापकाने दिल्ली हमी

219 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

अर्जुनी-मोर / संतोष रोकडे

गोंदिया :– अर्जुनी-मोर तालुक्यात सन २०१७ मध्ये अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकशान झाले होते. तत्कालीन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून एक कोटी ६७ लाख २२ हजार ४४९ रुपयांचा निधी एचडीएफसी बँकेच्या केसोरी शाखे मार्फत जमा केला होता. परंतु दोन वर्षाचा प्रधीर्ग कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम केली नव्हती या संदर्भात अर्जुनी-मोर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेली मदत करीत खात्यात जमा करण्यात यावी असे निवेदन देऊन ४८ तासात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा न झाल्यास एचडीएफसी बँक शाखेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्या इशाराची दखल घेत जाहीर झालेल्या नुकसानीची रक्कम येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची हमी नायब तहसीलदार गेडाम यांच्या समोर बँक व्यवस्थापक सचिन लडके यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना लेखी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसानीची रक्कम पंधरा दिवसात जमा होणार आहे यावेळी शिवसेना जिल्हा सचिव संजय पवार अर्जुनी-मोर तालुका प्रमुख अजय वालीवाल, तालुका संघटक चेतन दहीकर, युवा सेना तालुका प्रमुख अभिजीत मशिद, ज्ञानदेव कापगते, सुशील गहाणे, विनोद भजने, कैलास चुन्ने, नाना शिंदे, सुधाकर बोरकर, गुलाब गोटेफोडे, राजू कोलाम, विनोद गव्हाणे, राजू गव्हाणे व इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नुकसानीची रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केल्याने शेतकरी वर्गाकडून शिवसेना कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले जात आहे.