शाळेत विद्यार्थ्यांनी घनकरचा गोळा करत कोरोना व्हायरसच्या फोटोची जाळली होळी

207

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी /  गोंदिया
गोंदिया:- होळी हा सण दरवर्षी राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असला तरी यावर्षी कोरोना व्हायरसची दहशत या सणवार पडली असून गावात तसेच घरात परिसराला स्वच्छ ठेवून यावर नियंत्रण मिळविता यावा, यासाठी गोंदिया जिल्याच्या गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील घटनाकचरा जमा केला सोबतच कोरोना व्हायरसचे फोटोग्राप तयार करून कोरोनाची होळी करत कोरोना व्हायरस पासून स्वतःचा बचाव करण्याचा संदेश  विद्यार्थ्यांनी दिला.