Home गोंदिया गोंदियात तरुणाला टिप्परने चिरडले तरूण जागीच ठार

गोंदियात तरुणाला टिप्परने चिरडले तरूण जागीच ठार

119 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया :- दुचाकीने रस्त्याने जात असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाला भरधाव वेगाने रेती भरुन नेणाऱ्या टिप्परने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा या गावा जाळल हि घटना सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. असुन या अपघातात युवक जागीच ठार झाला असुन मृतक युवकाचे साकेत शेंडे असे नाव आहे. मृतक हा हॉबीटोला सावरी येथील रहिवासी होता. या दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती तसेच काही काळ त्या परिसरात तणावाचे वातावरण हि निर्माण झाले होते. त्या  वेळीच पोलिस घटनास्थळी दाखल घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली व टिप्पर चालक घटना स्थळवरून फरार झाला असुन पोलिसांनी फरार झालेल्या टिप्पर चालका विरुद्ध गोंदिया ग्रामिण पोलीस स्टेशन मध्ये गुना नोंद केला असुन, घटना स्थळी असलेला टिप्पर हि जप्त केला आहे.पोलीस  फरार टिप्पर चालकाचा शोध घेत आहे.