वडेगाव स्टेशन येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा

264

  विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

गोंदिया :- जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगाव स्टेशन येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच आदरणीय रश्मीताई खुणे यांनी महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील सौ रेखाताई राऊत ,सौ योगिताताई खुणे ,भारतीताई ठाकरे ,सीमाताई कुळमते, सुनिताताई सोनवणे सारिताताई कुंभरे, आशाताई खुणे,भारती ताई वाघधरे अंजनाताई कोहरे, कुमारी आरती शहारे,सौ गायत्रीताई पवार,लीलाताई मडावी, श्री गभने श्री कोडापे श्री डोंगरवार यांची उपस्थिती लाभली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री लेंढे, सूत्रसंचालन श्री उके तर आभार सौ योगीताताई खुणे यांनी मानले.