शेकडो महिलांनी सायकल चालवत महिलादिन केला साजरा

369
  • एक दिन सायकल के नाम या मोहिमे अंतर्गत

      विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

       राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया

गोंदिया:-  ८ मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त  अनेक वेग वेगळ्या ठिकाणी वेग-वेगळे कार्यक्रम करून महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. मात्र गोंदिया शहरातील महिलानी  मोठ्या संख्येने येऊन, महिला दिन सायकल चालवत मोठ्या उत्सवात साजरा केला. आज सकाळी-सकाळी जयस्तंभ चौकात शेकडो च्या संख्येने महिलांनी येऊन सायकल चालून महिला दिन मोठ्या उत्सवाने साजरा केला व तसेच महिलांनी सायकल चालत आपल्या लहान लहान पणाची आठवण ही केली. तर प्रत्येक रविवारी सुरु असलेल्या एक दिन सायकल के नाम या उपक्रमाला जुडून सायकल चालविले व  महिला बद्दल माहिती दिली.
जेसीआई गोंदिया राईस सिटी ने ८ जून २०१७ ला “एक दिन सायकल के नाम ” ह्या मोहिमेला सुरवात केली असुन आज त्या मोहिमेला १४३ आठवडे पूर्ण झाले असुन या १४३ व्य आठवड्याला महिला दिन विशेष करत शेकडो महिलांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या उपक्रम द्वारे प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवत असुन भविष्यात डिझेल, पेट्रोल, ची बचत करा तसेच पर्यावरण वाचविण्याचा एक छोटस पाऊल व स्वता ला सायकल चालवत निरोगी ठेवा असे संदेश या मोहिमेतून देण्यात येतात. मात्र आज ८ मार्च जागतिक महिला दिनी निम्मित गोंदिया येथील जयस्तंभ चौकातून या सायकल मोहिमेला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या पत्नी सविता विनोद अग्रवाल व नगर सेविका भावना कदम आल्या असुन यांही या सायकल मोहिमेत सहभाग घेत स्वतः सायकल चालवत जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, शहर पोलीस स्टेशन, गोरेलाल चौक, नेहरू चौक होत सुभाष गार्डन येथे या सायंकालीन मोहिमेला समारोप करण्यात आला व सर्व महिलांनि आम्ही हि प्रत्येक रविवारी सायकल चालवू व या मोहिमेमध्ये सहभागी होऊ अशी माहिती दिली आहे.