नवेगावबांध बस स्टॅन्ड अतिक्रमणाच्या विळख्यात सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त

223

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

गोंदिया: नवेगावबांध हे पर्यटनासाठी नावाजलेले गाव असून नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान न्यू नागझिरा नवेगाव बांध व्याघ्रप्रकल्प तसेच परिसरातील प्रमुख गाव म्हणून मोठ्या प्रमाणात परिसरातील लोकांची ये-जा सुरू असते. नवेगावबांध येथे ग्रामीण रुग्णालय पोलीस स्टेशन केंद्र शासनाचा नवोदय विद्यालय रेल्वे स्टेशन महाविद्यालय व प्रमुख व्यापार असल्यामुळे या परिसरात मोठी ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीमध्ये नवेगावबांध येथील बस स्टँड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होत आहेत. लहान व्यवसायिकांनी डांबरी रस्त्यापर्यंत आपले दुकानात असल्यामुळे वाहनांची खूप अडचण होतोय, त्यामुळे पर्यटकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही अजून पर्यंत सदर अतिक्रमण काढण्यात आले नाही त्यामुळे बांधकाम विभागाचे उपअभियंता आक्षेपाच्या नजरेत आहेत आता नागरिकांची अपेक्षा हे परिसराचे आमदार माननीय मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे वाढलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन बांधकाम विभागाच्या माध्यमातून सदर अतिक्रमण काढून बस स्टँड परिसरातील ये-जा सुरू असते.