विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

       राहुल चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया

आमगाव:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा) कटरे यांच्या मार्गदर्शनात व आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते आमगाव येथील आमदार जनसंपर्क कार्यालय येथे विशेष बैठक पार पडली असून यामध्ये तालुका अध्यक्ष पदी संजय बहेकार,शहर अध्यक्ष पदी अजय खेतान तर महिला तालूका अध्यक्ष पदी छबूताई उके यांची नियुक्ती करण्यात आली.
विधानसभा निवडणुकी पासून आमगाव तालुका कांग्रेस अध्यक्ष पद रिक्त होते. पण समोर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीला लक्षात घेता आमगाव तालुका अध्यक्ष, शहर व महिला तालुका अध्यक्ष पदाकरिता सर्व सहमतीने सर्व कांग्रेस कायकर्ता व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आमदार जनसंपर्क कार्यालयात सभा घेण्यात आली या वेळी कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा)कटरे यांच्या अध्यक्षतेखाली तर आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष पदी संजय बहेकार शहर अध्यक्ष पदी अजय खेतान तर महिला तालुका अध्यक्ष पदावर छबुताई उके नियुक्ती करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष उषाताई मेढे, रामसिग चव्हाण, इशूलाल भालेकर, कांताप्रसाद मिश्रा, राधेललाल रहांगडाले, लोकेश अग्रवाल, राजकुमार फुंडे, उषा भांडारकर, संजू डोये, महेश उके, जगदीश चुटे, राधाकिसन चुटे, नरेश बोपचे, गणेश हुकरे, नंदू कोरे, राहुल चुटे, तारेंद्र रामटेके, तसेच तालुक्यातील कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed