महिलादिना निमित्त स्वच्छता करणाऱ्या महिलांचा केला सत्कार

731
  • शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पडणाऱ्या १२२ महिला सफाई कामगारांचा सन्मान
  • महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआई गोंदिया राईस सिटी राबविला उपक्रम

         विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राधाकिसन चुटे/ जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- गोंदिया शहराची स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या त्या महिला स्वच्छता कामगार आहेत. शहरातील नागरिकांना घरातील कचरा रस्त्यावर म्हणा किंवा कुठेही फेकला तरी पसरलेली घाण स्वच्छ करण्याची जबाबदारी या महिला सफाई कामगारांवर आहे. त्यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, मात्र, या महिलांचा सन्मान गोंदिया जेसीआय राईस सिटी या सामाजिक संघटनेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १२२ स्वच्छता कामगार महिलांचा सत्कार केल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरवळत होते.
भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करत असताना जी महत्त्वाची आव्हाने, भारता पुढे आहेत त्यात स्वच्छता हे सर्वात मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आपण मोठ-मोठे उद्योग उभारले, धरणे बांधली, रेल्वे, रस्ते, विमानसेवा अशा अनेक बाबींत आपण खूप प्रगती करीत आहोत, पण स्वच्छता हा आतापर्यंत आपल्या देशात सर्वाधिक दुर्लक्षित विषय राहिला आहे. हेच काम नगर परिषदेच्या माध्य मातून ह्या १२२ महिला शहर स्वच्छतेची काम करतात. मात्र, त्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षाच येतेय. त्यांची स्वच्छतेची दखल कुठेही घेतल्या जात नाही. तेव्हा महिला दिनाच्या औचित्य साधून सर्व सफाई कामगार महिलांचा कौतुक करत असताना महिला दिन या औपचारिक दिन राहू नये म्हणून आज स्वच्छता अभियानातील सिंहाचा वाटा उचलणार्या स्त्रियांचं कौतुक करण्यासाठी जेसीआई गोंदिया राईस सिटी यांनी सफाई करणाऱ्या या १२२ महिलांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करून एक नवा पायंदा घातला. एक नवीन सुरवात केली आहे, या वेळी या सर्व महिला भारावून गेल्या अन् त्यांच्या डोळ्यातील अश्रू अक्षरशा अनावर झाले.