Home क्राइम जगत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पाच वर्षाच्या मुली समोरच पतीने  केली गळा दाबून...

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पाच वर्षाच्या मुली समोरच पतीने  केली गळा दाबून पत्नीची हत्या

79 views
0
  • गोंदियातील कुडवा येथील घटना, तीन दिवसात दोन हत्या जिल्ह्यात खळबळ, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

        विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

           राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया

गोंदिया- गोंदियात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून आपल्या पाच वर्षीय मुलीसमोरच तिची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज गोंदिया शहरातील कुडवा येथे उघडकीस आल्याने शहरात खळबळ माजली असून तीन दिवसात गोंदियात झालेली दुसरी हत्या आहे. मृतक महिलेची सुमन मनोज सावनकर  (२८ )असे नाव आहे. आरोपी मनोज झनकलाल सावनकर हा आपली पत्नी  सुमन  सावनकरच्या चारीत्र्यावर संशय घेवुन क्षुल्लक कारणा वरून त्याने त्याच्या मुली समोर हाताने मारपीठ करून भिंतीवर डोके आपटले  त्यानंतर  गळा दाबून खून केला. ही घटना लपविण्यासाठी त्याने तिला स्वत: दवाखान्यातही घेवून गेला तसेच डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर मनोजने सुमनला पुन्हा घरी आणून मृत अवस्थेत ठेवून   पसार झाला होता. पोलीसांनी  त्याचा शोध घेवुन अटक केली आहे. मात्र,गोंदियात शहरात मोठी खळबळ माजली आहे.