भारत पहिल्यांदा टी-20 विश्वचषकाच्या फायनल मद्ये , ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा

225
  • आयसीसीच्या नियमानुसार भारतीय संघाला रनरेटच्या आधारे फायनलचे तिकीट

         विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था – महिलांच्या टी-२० विश्वचषकाची फायनल आता जवळ आली आहे. यासाठी भारत आणि यजमान आॅस्ट्रेलियाचे महिला संघ सज्ज झाले आहेत. २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महिलांच्या या विश्वचषकाची फायनल येत्या रविवारी (८ मार्च) हाेणार आहे. तीन वेळच्या सेमीफायनलिस्ट भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचा संघ पहिल्यांदाच टी-२० च्या वर्ल्डकपची फायनल खेळणार आहे. यादरम्यान टीमला चार वेळच्या विश्वविजेत्या आणि यजमान आॅस्ट्रेलिया संघाच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. यजमान आॅस्ट्रेलिया संघाने करिअरमध्ये सलग सहाव्यांदा अंतिम फेरीचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आता हा अंतिम सामना अधिकच रंगतदार हाेणार असल्याची शक्यता क्रिकेट तज्ञांनी व्यक्त केली. भारतीय संघही कसून मेहनत घेत आहे. पहिल्यांदाच अंतिम सामना जिंकण्याच्या इराद्याने संघाचे खेळाडू मैदानावर उतरणार आहेत. पहिल्याच प्रयत्नात विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात पडण्यासाठी खेळाडू उत्सुक असल्याची प्रतिक्रिया हरमनप्रीतने दिली.

८ मार्च राेजी भारतीय महिला संघाची वर्ल्डकपची फायनल आहे. याच दिवशी भारताची कर्णधार हरमनप्रीत काैरचा वाढदिवस आहे. ती रविवारी ३१ व्या वर्षात पदार्पण करेल. आपल्या वाढदिवशी वर्ल्डकपची फायनल खेळणारी हरमनप्रीत काैर ही जगातील पहिलीच कर्णधार ठरणार आहे.

  • आयसीसीच्या नियम

पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना हाेऊ शकला नाही. आयसीसीच्या नियमानुसार भारतीय संघाला रनरेटच्या आधारे फायनलचे तिकीट मिळाले. मात्र, या नियमावर दाेन्ही संघांच्या कर्णधारांनी नाराजी व्यक्त केली. या सामन्यासाठी राखीव दिवसाची त्यांनी मागणी केली. याचा निश्चित असा फायदा हाेईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे आमच्यासाठी अधिकच दुर्दैवी ठरले की आम्ही मैदानावर खेळलाे नाही. नियमानुसार आम्हाला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. त्यामुळे आम्हालाही या नियमाचे पालन करावे लागणार आहे. अशा प्रकारच्या व्यत्ययाचा फटका बसणार, याची पूर्वकल्पना आम्हाला हाेती. त्यामुळेच सगळे मॅच जिंकले. – हरमनप्रीत, भारतीय कर्णधार

हा निर्णयच आमच्यासाठी धक्कादायक ठरला आहे. माेठ्या मेहनतीने आम्ही उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. मात्र, एका व्यत्ययाने आमच्या हातून अंतिम फेरीची संधी हिसकावली. यासाठी राखीव दिवसाची तरतूद गरजेची आहे. याचा माेठा फायदा हाेईल. गटातील एका पराभवाने ही संधी हुकली. -हीथर नाइट, कर्णधार, इंग्लंड महिला संघ