Home गोंदिया जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीसेविकांचे हल्लाबोल आंदोलन

जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीसेविकांचे हल्लाबोल आंदोलन

179 views
0
  • सरकारविरोधी केली घोषणाबाजी

         विदर्भ वतन न्युज पोर्टल, गोंदिया

         राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया

गोंदिया:- गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयावर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान शासन-प्रशासन विरोधात नारेबाजी करून जिल्हा परिषद कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. अनेकदा आंदोलन करुनही त्यांच्या मागण्याकडे शासनाने लक्ष दिले नाही. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अमृत पोषण आहाराचे बिले काढण्यात यावीत, अंगणवाडीसेविकांमधून ५० टक्के पर्यवेक्षकांची पदे भरण्यात यावी, अंगणवाड्यांना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या बचत गटांना वेळेवर बिल देण्यात यावे, अंगाणवाड्यात गँस सिलेंडर आणि शुद्ध पाण्याचे आरो देण्यात यावेत, अशा विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ यांना देण्यात आले. आंदोलनात शेकडो अंगणवाडीसेविका सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य द्वारावर काहीकाळ सेविकांनी बसून आंदोलन केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. अखेर जिल्हा परिषदेचे अधिकारी आंदोलन स्थळी पोहचले. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.