
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील बोरकन्हार गावात लग्न समारंभाकरिता आलेल्या तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने लग्न समारंभ असलेल्या घरी शोककाळा पसरली. मृतकामध्ये ३२ वर्षीय मुक्ता पटले १३ वर्षीय मुलगा आदित्य पटले १० वर्षीय मुलगी काजल पटले याचा समावेश आहे.
बोरकन्हार गावात एका कुटंबीयांनकडे लग्न समारंभ असून नागपुरातील पटेल कुटुंबीय या लग्नात आले असून संध्याकाळी ६ वाजे दरम्यान १३ वर्षीय आदित्य पटले याला सोच विधी लागल्याने तो आपल्या १० वर्षीय बहीण काजल पटलेला घेऊन घरा मागे असलेल्या तलावा जवळ गेला. तलावाच्या किनाऱ्यावरून पाण्यात पडताच त्याची बहीण काजल हिने आरडा ओरड करून भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र १५ मिनट होऊनही मुलगा मुलगी घरी परत न आल्याने त्याची आई हिने तलावा कडे गेली असता मुलगा पाण्यात बुडाल्याचे दिसताच तिने देखील मुलाला वाचविण्या करिता पाण्यात उतरली असून खड्यात पाय गेल्याने ती देखील पाण्यात बुडाली. आई बुडत असल्याने मुलगी देखील पाण्यात उत्तरी असून ती देखील पाण्यात बुडाली तर मुलगा मुलगी आई अर्धा तास लोटूनही घरी परत न आल्याने कुटंबीयांनी तलावात धाव घेतली असता तिघांचे मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे पाहून गावाऱ्याच्या मदतीने मृतदेह पाण्या बाहेर काढून स्वविच्छेदना करिता पटविण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असली तरी तालवाला लागून राज्य महामार्गाचे काम सुरु असून मागील वर्षी कंत्रादारने खोलिकरणाच्या नावावर तलावातील मुरूम खोदून तलावात मोठे खडे केले असून याच खड्यात या तिघांचा तोल गेल्याने याचा मृत्यू झल्याचे उघडकीस आले आहे.

