शेतकऱ्याला शेतात वाघाच्या डरकारीचे शेती रक्षक यंत्र लावणे चांगलेच महागात पडले

281
  • गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने शेती रक्षक यंत्राचा शोध घेत शेतकऱ्याला दिला सामूहिक चोप  

        विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

         राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया

गोंदिया :- गोंदियाच्या बरबसपुरा गावातिला शेतकऱ्याला शेतात वाघाच्या डरकारीचे शेती रक्षक यंत्र लावणे चांगलेच महागात पडले असून .गावकर्यांनी वन विभागाच्या मदतीने या शेती रक्षक यंत्रापर्यंत पोहचून शेतऱ्याला सामूहिक चोप दिला. मात्र यात माजी काय चूक असा प्रश्न शेतकऱ्यानी गावकऱ्यांना करत तुम्ही माझ्या शेतातील नुकशान भरून देणार काय असा प्रशन या निमित्ताने उपस्थित केला.
एक महिन्या आधी बरबसपुरा गावात वाघाने हजेरी लावत जंगलाच्या दिशेने पढ काढला असून .वाघाचे पघ मार्ग दिसताच गावकऱ्यांना मध्ये भीती पसरली होती .मात्र हि भीती दूर होताच पुन्हा आपल्या गावात एका महिन्या नंतर रात्री ९ वाजे नंतर वाघ येऊन डरकाळी मारतो हे लक्षात येताच .गावाऱ्यांनी याचा शोध घेतला असता. दुसऱ्या दिवशी देखील वाघाच्या डरकारीचा आवाज येताच गावकऱ्यांनी याची माहिती वन विभागाला देत ज्या दिशेने वाघाची आवज येत आहे. त्या दिशेने लाठ्या काठ्या हाती घेत आपला मोर्चा वाढविला असता. गावा शेजारी एक किलोमीटर अंतरावर शिशुपाल मदनकर या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या शेतात असलेल्या मक्का पिकाचे रान डुकरांन पासून तसेच चितळा पासून सौरक्षण करण्या करिता .वाघाच्या डरकारिचा शेती रक्षक यंत्र लावल्या मुळे त्याच्या शेतात रानडुकराचा हवदोस तर कमी झाला . मात्र याची माहिती त्यांनी परिसरातील लोकांना आणि गावकऱ्यांना दिली नाही याचा दुसपरिणाम मात्र शेतकऱ्याला सहन करावा लागला. 
तर २०१६ -१७ पर्यत ज्या शेतकऱ्याच्या शेतात वन्यजीव प्राण्याचा त्रास असेल अस्या शेतकर्यांना २०१७ पर्यंत वन विभागाकडून वाघाच्या तसेच कुत्र्याच्या आवाजाचा शेती रक्षक यंत्र दिला जात होता .मात्र निधी अभावी हे यंत्र वन विभागाने देणे बंद केल्याने . शेतकर्यानी नामी शकलं लढवत हे यंत्र ऑनलाईन खरेदी केले .मात्र वाघाचा रेकोर्डिंग आवाज शेतकऱ्याच्या जीवाशी पडला .
त्यामुळे तुम्ही जर आपल्या शेतातील पिकाचे सौरक्षण करन्या करिता असे यंत्र लावत असाल तर आधी परिसरातील लोकांना याची माहिती द्या त्यामुळे गावात वाघ आला रे अशी म्हण्याची वेळ गावकऱ्यांवर येणार नाही इतकंच…