सुरकुडा येथे किसानगोष्टी चे आयोजन

352

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राहुल चुटे/ तालुका प्रतिनिधी / आमगाव

आमगाव:- तालुका कृषी अधिकारी कार्यालय आमगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा आत्मा च्या वतीने आमगाव तालुक्यातील सुरकुडा येथील ग्रामपंचायत कार्यालय पटांगणावर येथे आत्मा 2019- 20 अंतर्गत क्षेत्रिय दिन किसान गोष्टी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हनुमंत जी वट्टी, कार्यक्रमाचे उद्घाटन धनवंता वटी मॅडम यांनी भूषविले प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम असोली येथील सेंद्रीय शेती करणारे कैलास जी बघेले तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय आमगाव येथील कृषी पर्यवेक्षक जीए चौधरी व कृषी सहायक टिव्ही सूर्यवंशी एनबी मुंढे व्हिडि सहारे तसेच आत्मा चमूचे बीटीएम सुषमा शिवणकर व एटीएम राहुल सेंगर हे उपस्थित होते, जी. चौधरी यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक दृष्ट्या शेती कशी करावी याचे मार्गदर्शन केले तसेच टीव्ही सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजने बाबत मार्गदर्शन केले. श्री. कैलास बघेले यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सूचना शिवणकर यांनी केले असून आभार प्रदर्शन राहुल सेँगर यांनी केले.