प्रेम संबंधातून प्रियेसीचा बापाने केली प्रियकराची हत्या, २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला केली अटक 

274

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या मोरवाही गावात काल १७ वर्षीय अतुल तरोणे या तरुणाची हत्या करण्यात आली असल्याने परिसरात खळबळ उडाली होती मात्र हि हत्या आपसी वैमन्यासातून केली असावी असा प्राथमिक अंदाज सुरवातीला लावण्यात आला होता मात्र पोलिसांनी तपास चक्रे फिरवत हि हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आली असल्याचे उघडकीस आल्यास गावातील तरुणीच्या वडीलाला ताब्यात घेतले.  माझ्या मुलीचे या तरुणांशी प्रेम संबंध असून आपल्याला हे प्रेम सबंध मान्य नसल्याने आरोपीने हत्येचा कट रचला असून, त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसाना दिली. गोंदिया जिल्ह्याच्या मोरवाही गावातील १७ वर्षीय अतुल तरोने हा ११ व्या वर्गात शिकत होता. मात्र त्याचे १० व्या वर्गाचे दोन विषय अडकले असल्याने काल तो मराठी विषयाचा पेपर देऊन घरी परत जात असताना त्याच्या प्रियशीच्या वडिलाने त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत हत्या करत पळ काढाला असून, अतुल रुग्णालयात आणले.  डॉ त्यांना मृत घोषित केले असून पोलिसांनी आरोपीला अटक करण्या करिता तीन पथके तयार केली होती. अतुलचे गावातील एका तरुणीशी प्रेम संबध होते. हे प्रियेशीच्या वडिलांना मान्य नव्हते त्यातूनच त्यांनी हि हत्या केली असल्याचा संशय येताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत विचारपूस केली. प्रेम संबध पसंद नसलायने हि हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली असून आरोपी विरुद्ध कलम ३०२ अणनवे गुन्हा दाखल कारणात आले आहे.