मेडिकल मोबाईल गाडीचे ब्रेक फेल झाल्याने गाड़ी दुर्घटनाग्रस्त, १ ची मृत्यु तर २ जणी जखमी

275

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

अर्जुनी-मोर / संतोष रोकडे

गोंदिया:- अर्जुनी/मोर पासून पाच किलोमीटर अंतरावर कोहमारा व जसा राज्य महामार्गावर बाराभाटी येथील राईस मिल जवळ मेडिकल मोबाईल गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्यावरून जात असतांना समतोल  बिघडल्यामुळे  रस्त्याच्या कडेला उतरून पलटली. गाडीत मोबाईल मेडीकल युनिट चे डॉक्टर आनंद कुकडे व त्यांची दोन सहकारी होते. गाडीत असलेल्या तिघांपैकी नवेगाव बांध येथील येथील रहिवासी सुभाष कुंभरे गाडीच्या खाली आल्याने त्यांचे जाग्यावरच निधन झाले अन्य दोघांना अर्जुनी-मोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे