विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था – उत्तर/पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार करणारा आरोपी मोहम्मद शाहरुखला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिस आणि क्राइम ब्रांचने आज(मंगळवार) शाहरुखला उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून ताब्यात घेतले. शाहरुखने 24 फेब्रुवारीला जाफराबादमध्ये पोलिस जवानांनावर बंदुक रोखली होती आणि 8 राउंड फायर केले होते. मागील 8 दिवसांपासून तो फरार होता.

यापूर्वी क्राइम ब्रांचला शाहरुख बरेलीमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली होती. यावर दिल्ली पोलिस आणि क्राइम ब्रांचची 10 पथके त्याचा शोध घेत होती. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शाहरुख फायरिंगनंतर पानीपत, कैराना, अमरोहा अशा अनेक शहरात लपत होता. अखेर त्याला बरेलीमधून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed