गोंदियात राष्ट्रीय  शहीद जवान फ्लड लाईट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

217
  • राष्टीय स्थरावरील १२ चमू झाल्या सहभागी  

        विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

 राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया

गोंदिया:- गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व जिल्हा फुटबॉल असोसिएशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यात शहीद झालेल्या पोलिस जवानांना श्रद्धाजंली वाहाण्यसाठी गोंदियात ३ मार्च ते ८ मार्च या कालावधीत राष्ट्रीय शहीद जवान फ्लड लाईट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियम येथे योजित करण्यात आले आहे.
या फुटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील रब्बानी क्लब कामठी, न्यु स्पोर्र्टिंग सॉकर क्लब चरचा, छत्तीसगड, चेन्नई कस्टॅम चेन्नई, एम.ई.जी. बंगलोर आर्मी, बी.ई.जी. पुणे, एअर इंडिया मुंबई, बालाघाट जिल्हा फुटबॉल असोसिएशन, गोंदिया जिल्हा फुटबॉल असोसिएशन, आर्टिलरी सेंटर, हैदराबाद आर्मी, राहुल क्लब नागपुर, महाराष्ट्र पोलीस मुंबई, जम्मू-कश्मीर पोलीस संघ या सर्वानी भाग घेतला. या स्पर्धेत  विजेत्या संघाला एक लाख व उपविजेत्या संघाला ७५ हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय, दोन उत्कृष्ट खेळाडुंना प्रोत्साहन विशेष आकर्षक पारितोषीक दिले जाणार आहेत. विजेत्या संघासाठी चार फुट उंचीची ट्राफी तयार करण्यात आली असुन, त्यात एक फुटबॉल ठेवण्यासाठी जागाही आहे. त्यात फुटबॉल ठेवला तर पाच फुट उंच ट्रॉफी राहणार आहे. विशेष म्हणजे, ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सायंकाळी ५ वाजता महिला फुटबॉल सामन्याने या स्पर्धेचा मारोप करण्यात येईल.