Home क्राइम जगत १० व्या वर्गात शिकणाऱ्या तरुणांची पेपर देऊन परत येत असताना केली हत्या

१० व्या वर्गात शिकणाऱ्या तरुणांची पेपर देऊन परत येत असताना केली हत्या

138 views
0
  • अज्ञान आरोपीने केला चाकूने वार

       विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

गोंदिया :- गोंदीयाच्या मोरवाही गावात आपसी वैमनस्यातुन १० व्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय अतुल तरोणे  या तरुणावर चाकुने वार करत गावाजवळच हत्या करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मध्ये खडबड उडाली आहे.
मोरवाही गावातील १७ वर्षीय अतुल तरोने हा दाहाव्या वर्गात शिकत असुन काल १० व्या वर्गाचा मराठी विषयाचा पेपर आठोपुन तो गावी  परत येत असताना . गावा शेजारी शेतात दबा धरुन बसलेल्या आरोपीने अतुलला अडवत शेतात नेऊन त्याच्या गड्यावर पाठिवर तोंडावर चाकुने वार केले आरोपीने अतुलची जिभ देखील कापली असुन, याची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली.  मृतदेह ताब्यात घेत स्वविछेदना करिता पाठविण्यात आले. १० व्या वर्गाची परिक्षा सुरु असताना अतुलची अज्ञात आरोपीने हत्या केल्याने विद्यार्थ्यांन मध्ये दहशतीचे वातावरण तयार निर्माण झाले असुन गोंदीया ग्रामीण पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.