आमगांव तालुक्यातील तीन ट्रैक्टर रेती सहित जप्त, तरीही अवैध रित्या रेती व मुरून उत्खनन सुरूच

266

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

गोंदिया दिनांक 2 मार्च रोजी तहसीलदार डी. एस. भोयर आमगाव यांच्या पथकाने तीन टॅक्टर रेती सह जप्त केलेले आहे. प्रत्येकी एका ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास रेती जप्त करून त्यांच्यावर जमीन महसूल अधिनियम 1966 च्या 48 व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार व दिनांक 12 जनवरी 2008 मधील परीक्षेत 8.9 आणि 9.2 मधील तरतुदीनुसार अवैधरित्या वाहतूक केल्यास शक्ती 100000 रु व खनिजाच्या मूल्यावर पाचपट दंड 15,000 रूपये व स्वामित्वधनाची कल 400 रुपये असे एकूण एका ट्रॅक्टर वर 1,15,400 असे ह्या प्रमाणे तिन्ही ट्रॅक्टर वर चालन करून दंड आकारले तिन्ही, तीन वेगवेगळ्या व्यक्तीचे मालकीचे ट्रॅक्टर आहेत. तहसील कार्यालय मार्फत अनेकदा अनेक ह्या प्रकारे टॅक्टर मालकावर दंड आकारून सुद्धा अनेक ट्रॅक्टर मालकाकडून अवैधरीत्या रेती व मुरूमचे कारभार सुरूच दिसून येत आहे .