
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर : साहित्यिक, विचारवंत कवी डॉ. ईश्वर नंदपुरे लिखीत ‘मेरी मंजिल’ या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. १५ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५.३० वा. शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या काव्यसंग्रहाचे उद्घाटन डॉ. हरीसिंग गौर विद्यापीठ, सागर (म.प्र.) चे माजी कुलगुरू डॉ. नामदेव गजभिये करतील. साहित्यिक व कवी प्रा. डॉ. बळवंत भोयर आणि कथा, कादंबरीकार हिंदी कवयित्री डॉ. सुशीला ताकभौरे हे या काव्यसंग्रहामधील कवितांच्या आशयांचा उलगडा करतील. यावेळी हिंदी साहित्यिक व कवी डॉ. सागर खादीवाला यांची प्रामुख्याने उपस्थिती राहिल. हा काव्य प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूर आणि अन्नाभाऊ साठे साहित्य व कला अकादमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून काव्य रसिकांनी या प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन समीर सराफ, डॉ. प्रदीप विळाळकर, प्रेमकुमार लुनावत, रमेश बोरकुटे, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. मंजुषा सावरकर, लोकनाथ यशवंत, शेख मोहम्मद सलीम, अनिल इंदाने, निशीकांत काशीकर, रेखा दंडिे- घिया, आशुतोष शेवाळकर, अनिल अहिरकर, चंद्रकांत वानखेडे, प्रकाश डोंगरे आदींनी केले.

