
- दहावी बारावी पदवी व पदव्युत्तर तसेच अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांची आर्त हाक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
अर्जुनी-मोर / संतोष रोकडे
गोंदिया – सध्याच्या आधुनिक युगामध्ये एका हातामध्ये अँड्रॉइड मोबाइल असल्याने युवक रिकामा जरी दिसत नसला तरी त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन शासनदरबारी उपलब्ध नसल्याने दहावी बारावी पदवी तसेच पदव्युत्तर पदवी घेणारे असंख्य युवक-युवती यांच्या हाताला काम देण्यास शासन अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.l त्यामुळे अनेक तरुण मानसिक संतुलन ढासळून व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे काही उच्चशिक्षित तरुण तरुणी अवैध मार्गाचा वापर करून पोटाची खळगी भागविण्याचे काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे
शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना घर गाडा चालविणाऱ्या आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी काम करण्याची भरपूर इच्छा असते पण आजच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे अनेक व्यापार ठप्प पडत आहेत तर दुसरीकडे या व्यवहारामुळे स्थानिक रोजगार हिरावला जात आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग हळू-हळू बंद होत आहेत. या गंभीर बाबीकडे अजून पर्यंत शासनाचे लक्ष गेलेले दिसून येत नाही याउलट परिस्थिती म्हणजे ऑनलाईन व कॅशलेस व्यवहार करण्यासाठी शासन गंभीर असून असे व्यवहार करण्यासाठी शक्ती आणत आहे. या प्रकारामुळे तरुण वर्ग आकर्षिला जात आहे गेल्या जवळपास सात आठ वर्षाच्या कालावधीत शासकीय स्तरावर नोकर भरती ठप्प पडली आहे अनेक शिक्षक खाजगी शाळांवर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. शासन एखादी मोठी पदभरती करेल आणि आपण शासकीय सेवेत लागू अशी अपेक्षा बाळगून असणारे असंख्य युवक-युवतींचा हिरमोड होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे वाढत्या बेरोजगारीमुळे कोणत्याही मोर्चामध्ये धरणे आंदोलनामध्ये विविध पक्ष्यांच्या पक्षबांधणी मध्ये युवक वाटल्या जाऊन व्यसनांच्या आहारी सुद्धा जात असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकारांमुळे शहरासह ग्रामीण भागातील चौकाचौकात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची घोडके निर्माण होऊन चिडीमार प्रकरणे वाढली असल्याचे चित्र आहे अल्पशिक्षित बरोबरच सुशिक्षित तरुणांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे कामच उपलब्ध नसल्याने करावे तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे. या बाबीकडे युवकांच्या आई-वडिलांसह शासन प्रशासनाने लक्ष केंद्रित करून नवा भारत देश घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे काळाची गरज झाली आहे.

