Home गोंदिया तालुक्यातील काही गावे अजूनही बससेवे पासून वंचित

तालुक्यातील काही गावे अजूनही बससेवे पासून वंचित

126 views
0
  • स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षानंतरही या गावाच्या भूमीला बसचे दर्शन झाले दुर्लभ

       विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

अर्जुनी-मोर / संतोष रोकडे

अर्जुनी/मोर- भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल तर एक मे 1960 ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन एक मे 1999 ला गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. गोंदिया जिल्ह्याची  निर्मिती पूर्वी आत्ताच्या गोंदिया जिल्ह्यातील शेवटचे टोकावरील आदिवासी दुर्गम तसेच अविकसित तालुका म्हणून अर्जुनी-मोर तालुक्याची शासन दरबारी नोंद आहे मात्र स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही अर्जुनी-मोर तालुक्यातील काही गावे बस सेवेपासून वंचित असल्याचे विदारक स्थिती आहे,  त्यामुळे गाव तिथे बस सेवा हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य कितपत खरे हे एक न उलगडणारे कोडेच आहे.
अर्जुनी मोर तालुका विकासापासून कोसो दूर आहे तसाही भारत देश हा खेड्यांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे.  देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 65 ते 70 टक्के लोकसंख्या ही खेड्यात वास्तव्य करते तर खेड्यातील जनतेचे उपजीविकेचे साधन शेती आहे. शासनाच्या गाव तिथे रस्ता, गाव तिथे बस सेवा, हात दाखवा बस थांबवा हे ब्रीद आहेत.  तालुक्यातील अनेक गावात अजूनही पक्के रस्ते नाहीत आणि त्यामुळे अर्जुनी-मोर तालुक्यातील काही गावात राज्य परिवहन महामंडळ बस सेवा पुरवत नसावी असे वाटते.
अर्जुनी-मोर तालुक्यातील बुधे वाडा कन्नाळगाव, वडेगाव स्टेशन, परसटोला इटखेडा, इसापूर,, खामकुर, हेटी ये गाव जानवा कोरंबी ही गावे अजून पर्यंत त् बससेवेचे पासून वंचित राहिलेले आहे. विशेष म्हणजे वर उल्लेख केलेल्या गावातील ईटखेडा येथे भंडारा लाखांदूर ही एक बस तसेच भंडारा साकोली ही एक बस दररोज रात्री नऊ वाजे इटखेडा येथे होल्डिंग म्हणून येते व सकाळीच 6 वाजे परत जातात त्या नंतर दिवसभर एकही बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो हीच हल्टींग बस वरील उल्लेख केलेल्या गावात वाढविली गेली तर त्या गावातील लोकांना या बससेवेचा फायदा होऊ शकतो तसेच या गावात दिवसासुद्धा बसफेऱ्या सुरू कराव्या अशी मागणी जनतेकडून होत आहे.
काही महिन्यापूर्वी याची दखल अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी घेऊन साकोली आधार व्यवस्थापकांकडे मागणी केली मात्र चालक-वाहक कमतरता असल्याने आम्ही या गावात बस सेवा देऊ शकत नाही असे कारण साकोली आधार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितल्याचे अरविंद शिवणकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे सांगितले आहे तर या बससेवेचा संदर्भाने प्रस्तुत प्रतिनिधीने आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे बस सेवा सुरू करण्यासाठी चालक-वाहक कमतरता आहे. येत्या 15दिवसात चालक वाहक भरती प्रक्रिया सुरू असून आल्यानंतरच या गावात बससेवा सुरू करू असे सांगितले.