
- शिक्षकांनाही शाळेत जाण्यास अडवले
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला बंद करण्याची घोषणा महाआघाडी सरकारच्या शिक्षण मंत्र्याने केल्याने नाराज़ होवून पालक व शाळा समिती च्या सदस्यांनी आज २९ फेब्रुवारी ला जिल्हा परिषदेची भारतरत्न अटलबिहारी वाजपेई आंतरराष्ट्रीय जिल्हा परीषद शाळेला कुलूप ठोकले. शाळे समोर शासनाच्या विरोधात प्रदर्शन करीत शिक्षकांना हि शाळेत जाण्यास रोकले.
फडणवीस सरकारच्या मागील कार्यकाळात माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जिल्ह्या परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करून राज्यातील ८३ जिल्हा परिषद शाळेला या मंडळाशी जोडले व त्या शाळेचे नाव भारतरत्न अटलबिहारी वाजपेई देण्यात आले. या पैकी गोंदिया जिल्हयातील दोन जिल्हा परिषद शाळेचा समावेश करण्यात आला होता. परंतु २६ फेब्रुवारी ला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या मंडळाला बंद करण्याची घोषणा केल्याने या शाळेच्या आंतरराष्ट्रीय दर्जा काढण्यात येणार असल्याने गोंदिया जिल्ह्यतील गोरेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या हिरडामाली येथील जिल्हा परीषदेची भारतरत्न अटलबिहारी वाजपेई आत्तर्राष्ट्रीय शाळेची व्यवस्थापन समिती व पालकांनी शासनाच्या या घोषणेच्या विरोध करीत आज शाळेला कुलूप ठोकले व शाळेतील कार्यरत शिक्षकांना शाळेबाहेर रोकले. तसेच शाळेसमोर प्रदर्शन करीत मागणी केली कि, पूर्वरत मंडळाला सुरु ठेवावे जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत शाळांचा कुलूप उघडू देणार नाही. व पाल्याना शाळेत पाठवणार नाही. या आंदोलनाची माहिती जिल्हाअधिकारी च्या मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

