गोंदियात बनावटी देशी दारू पकडली७ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त, उप्तादन शुल्क विभागाची गाडी फोडली

206

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- राज्य उत्पादन शुल्क विभागला गुप्त माहिती मिळली कि गोंदिया शहरातील बाजपाई वॉर्ड येथे धर्मकाटा च्या बाजूला महिंद्रा बोलेरो या गाडीत बनावटी देशी दारू आहे. माहिती मिळताच २८ फेब्रुवारी ला रात्री ८ च्या सुमारास विभागाने घटना स्थळी धाड घातली.  त्या विना नंबर असलेल्या महिंद्रा बोलेरो गाडी मध्ये बनावटी दारू असलेला रॉकेट कंपनीच्या बॉक्स मध्ये २ लाख २१ हजारांची दारू आढळेली आहे.  संपूर्ण बनावटी ची  दारू व गाडी विभागाने जप्त करत गोंदिया येथे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दारुचे बॉक्क्स ठेवण्यात आले व गाडी कार्यलयाच्या आवारात ठेवण्यात आली.  विभागाची गाडी पकडलेल्या गाडीच्या मागे ठेवण्यात आली  गाडी कोणीही नेता कामे नाही मात्र मध्य रात्री अज्ञात आरोपीने विभागाची गाडी तोड फोड केली असुन याची तक्रार गोंदिया शहर पोलिसात करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात या आधी अनेकदा बनावटी दारू पकडण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर प्रशासना कडून कोणतीही मोठी कार्यवाही होत नसल्याने वारंवार बनावटी दारू तयार करणारे आपले काम बंद करत नाही तसेच गोंदिया येथे बनावटी दारू तयार करुन गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्याने गोंदिया येथे बनावटी दारू तयार करून चंद्रपूर आणि गडचिरोली तस्करी करण्यात येते. गोंदिया येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कार्यवाहीत रॉकेट कंपनीचे ८५ बॉक्स मध्ये ९० एम च्या देशीच्या ८५०० बॉटल असुन संपूर्ण माल हा ७ लाख ७१ हजार रुपयांचा असून तो जप्त करण्यात आलेला आहे.