जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचविले

9

विदर्भ वतन न्यूज पेपर/ न्यूजपोर्टल : नागपूर 
स्वातंत्र्या नंतर शत्रुत्वाच्या आगीत होरपळत जगणाऱ्या भारत पाकिस्तान या दोन्ही देशा कडून आपल्या मरणाचीही फिकीर न केल्यामुळे गौरवलेली नीरजा भनोत ही एकमेव भारतीय विरांगना होती, जिने 1986 साली स्वतःच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचविले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. आज तिची पुण्यतिथी. खरंतर महिला सक्षमीकरणासाठी चळवळ करणाऱ्या स्त्री संघटनानी तरी तिची आठवण ठेवावयास हवी होती.
विमानप्रवाससेविका म्हणजेच एअर हाॅस्टेस म्हणून काम करणाऱ्या “नीरजा भानोत” यांनी विमानअपहरण घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचा जीव वाचण्याच्या प्रयत्नात बलिदान दिले. नीरजा यांच्या शौर्याला कडक सॅल्युट !
नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी . 5 सप्टेंबर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात 400 प्रवासी होते. निरजा सुद्धा याच विमानात होती.