‘सप्‍तक’तर्फे विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिम‍ित्‍त आयोजन

5

विदर्भ वतन वृत्तपत्र /न्यूज पोर्टल :

                   पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे 13 नोव्हेंबर रोजी शास्त्रीय गायन

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सप्तक नागपूर तर्फे प्रसिद्ध शास्‍त्रीय गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुश्राव्य शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम 13 नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता विदर्भ साहित्य संघाचे ‘अमेय दालन’, सांस्कृतिक संकुल, चौथा माळा, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराना घराण्याचे सुपरिचित नाव असलेले तसेच आकाशवाणीचे ‘अ’ दर्जाचे गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी मराठी आणि कानडी चित्रपटासाठी गाणी देखील गायली आहे. कर्नाटकातील हुबळी येथे जन्मलेल्‍या मेवुंडी यांचे ‘बोलावा विठ्ठल’, ‘तीर्थ विठ्ठल’, ‘सनसेट इन धारवाड’, ‘ब्लिसफूल रागाज’, हीलिंग मंत्रा फॉर अर्थ्रायटिस’, सावळा सुंदर’ हे अल्बम्स प्रसिद्ध आहेत.
पं. जयतीर्थ मेवुंडी यांना तबल्‍यावर संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्रीकांत पिसे साथसंगत करतील. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघ आणि सप्तकच्यावतीने करण्‍यात आले आहे. कार पार्किंगची व्यवस्था सेवासदनच्या प्रांगणात करण्यात आली असून रसिक श्रोत्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.