आमदार धानोरकर पदाधिकाऱ्यांसह नगर परिषदेत धडकल्या

10

विदर्भ वतन वृत्तपत्र /न्यूज पोर्टल : वरोरा

वरोरा शहरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठा बाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर आज थेट नगरपरिषदेत पोहोचल्या .प्रशासनाला याबाबत जाब विचारून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद गतीने पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या मागील दोन महिन्यापासून संपूर्ण शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या  सोमवारी सकाळी आमदार धानोरकर पदाधिकाऱ्यांसह नगर परिषदेत धडकल्या मुख्याधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी याबाबत धारेवर धरले पाणीपुरवठा बाबतच्या अडचणी जलद गतीने सोडवून वरोरा शहराचा पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचा सुचना केल्या. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देऊन नवीन पाणी पंप खरेदीसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या नवीन विस्तारीत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याच्या दृष्टीने लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न घेऊ असेही आमदार धानोरकर म्हणाल्या.