निःशुल्क आरोग्य निदान शिबिराला समजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

79

 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच तथा संतकृपा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाल नगर, नागपूर येथे निःशुल्क आरोग्य शिबिर समाज बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
शिबिराचे उदघाट्न मा. श्री. अंबादासजी पाटील साहेब वरिष्ठ मार्गदर्शक, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मा.श्री.श्यामभाऊ आस्करकर साहेब, प्रदेश उपाध्यक्ष, मा.श्री. वैभव तुरक, जिल्हाध्यक्ष मनाम एकता मंच आणि मा.श्री.विष्णुजी ईजनकर कार्याध्यक्ष, मा.विजयभाऊ वालुकर कार्यालयीन सचिव, मा.श्री. महादेवजी जिचकार प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र नाभीक महामंडळ नागपूर जिल्हा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
शिबिरात नागपूर महामंडळ च्या महिला जिल्हाध्यक्ष अर्चना कडू, मनीषा पापडकर जिल्हा कार्याध्यक्ष, स्मिता नक्षणे, दक्षिण पश्चिम अध्यक्षा, मंजुषा पानबुडे, जिल्हा संघटीका प्रामुख्याने उपस्थित होत्या.
शिबिराला प्रमुख मा.डॉ ऐश्वर्या जोशी, मा डॉ नितिन कान्होलकर, मा डॉ अजय भोजवाणी व मा डॉ निखिल घोडिचोर यांनी निःशुल्क आरोग्य निदान सेवा प्रदान केली. या सेवेचा एकुण 218 समाजबांधव तथा परिसर नागरिकांनी लाभ घेतला. तसेच शिबिराला pathkind labs यांच्या सौजन्याने व मा.तुषार भांडारकर यांच्या मार्फत फुल बॉडी चेकअप ची सवलतीच्या दरात सेवा प्रदान करण्यात आली या सेवेचा एकुण 51नागरिकांनी लाभ घेतला. तसेच रक्तदाब व रक्तातील शुगर ची मोफत सेवा व सवलतीचा दरात औषधीचा पुरवठा संतक्रुपा मेडिकलच्या सौजन्याने मा.पंकज कानेटकर यांच्या मार्फत करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोपिय सत्रात मान्यवर वैद्यकीय चिकित्सक व इतर वैद्यकीय सेवा संस्था चा सत्कार महाराष्ट् नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा सरचिटणीस मा. श्री. राजेंद्रजी इंगळे, मा प्रमोदजी तभाने माजी नगर सेवक, मा.श्री. राजुभाऊ चिंचाळकर जिल्हा उपाध्यक्ष मनाम, मा स्वप्निल तळखंडे विभागध्यक्ष मनाम एकता मंच यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री नितिनजी पांडे,प्रविणजी निंबाळकर, भुषणजी सवाईकर, डॉ योगेश्वर राऊत सर ,सुधीरजी आबुलकर, रितेशजी रोहनकर, सारंग खैरकर,मा.श्यामजी अंजनकर,मा.अमोलजी येऊतकर यांचे सहकार्य तसेच विवेकजी तळखंडे व रविंद्रजी नक्षने यांचे विशेष सहकार्य लाभले