नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातही मिळणार ‘ट्रायल शो’ च्या पासेस

10

नागपूर,
फुटाळा म्युझिकल फाउंटेन आणि लाईट अँड साऊंड शोच्या ‘ट्रायल शो’ला नागपूरकरांचा वाढता प्रतिसाद बघता शोच्या पासेस आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातही उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.
फाउंटेन शोची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत असून नागरिकांच्‍या प्रचंड मागणीवरून खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूरच्या वतीने 16 ऑक्टोबर 2022 पासून परत एकदा म्युझिकल फाउंटेन आणि लाईट अँड साऊंड शोच्या ‘ट्रायल शोला प्रारंभ करण्‍यात आला आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी 7 आणि रात्री 9 वाजता होणाऱ्या ‘ट्रायल शो’ च्या त्या-त्या दिवसाच्या शोच्या पासेस कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाइन्स यासह आता नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, सावरकर नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ, खामला, नागपूर येथूनही सकाळी 11 ते 1 या वेळेत वितरित केल्या जाणार आहेत.
तेव्‍हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या म्युझिकल फाउंटन शोचा नागपूरकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी केले आहे.