वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकावर कारवाई

96

विदर्भ वतन वृत्तपत्र /न्यूज पोर्टल : लाखनी
शहरांमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातावर आळा घालण्याकरिता अल्पवयीनवाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकावर कारवाई तसेच अपघातामध्ये नेक लोकांचे जीव जातात. तसेच स्वतःचाही जीव धोक्यात घालतात. त्य सर्व अपघात थांबवण्याकरीता  मा.पोलीस अधीक्षक श्री.लोहित मतानी भंडारा व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.अनिकेत भारती,भंडारा यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.मिलिंद तायडे ठाणेदार पो.स्टे लाखनी व पोलीस उपनिरीक्षक भुषण कोळी वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा यांच्या  पथकाने लाखनी शहर परिसरात धोकादायक रित्या वाहन चालविणे व अल्पवयीन वाहन चालकांवर कार्यवाही मोहीम राबविली असून 1)मो.सा क्रं MH-36 Y-0325 वाहन चालक कार्तिक उमेश रेहपाडे, वाहन मालक – उमेश हरिभाऊ रेहपाडे 2)मो.सा क्रं MH-40 D-7633 वाहन चालक – पराग गणेश जांभुळकर, वाहन मालक – माधव काळे 3)मो.सा क्रं MH-36 AE-6353 चालक पवन धनराज साकुरे , वाहन मालक – धनराज उमराव साकुरे 4)मो.सा क्रं MH-31 DG-8667 चालक -जगदीश संतोष पचारे, वाहन मालक – नरेंद्र पारसवार असे एकुण 04 दुचाकी वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुले व आपल्या ताब्यातील वाहन अल्पवयीन मुलांना चालविण्यास दिले असता पो.स्टे लाखनी येथे अप क्रं 206/2022,   207/2022,,208/2022,,209/2022 अन्वये कलम 184,199 (अ)(1) मोटार वाहन कायद्यान्वये 4 वाहन चालक व 4 वाहनांच्या मालकांवर गुन्हे नोंद करुन क.207 मोटार वाहन कायद्यान्वये सदर 4 दुचाकी पो.स्टे लाखनी येथे जप्त करण्यात आली आहे. सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक भुषण कोळी वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा व त्यांचे पथकातील पोलीस हवालदार गिरीश रामटेके, पोलीस हवालदार प्रकाश हलमारे, पो.स्टे लाखनी पो.स्टाफ पोलीस हवालदार प्रकाश न्यायमूर्ती, पोलीस हवालदार निरज साबळे यांनी केली आहे.

पालकांना आवाहन सूचना

धोकादायक रित्या वाहन चालवून कुणाच्याही जिवीतास धोका निर्माण करु नये.
तसेच आपल्या ताब्यातील वाहन अल्पवयीन मुलांना चालविण्यास देवू नये अन्यथा वरीलप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.