बाबा रघुनाथस्वामी हायस्कूलमध्ये गांधी सप्ताह साजरा

35
विदर्भ वतन वृत्तपत्र /न्यूज पोर्टल : नागपूर
      राजीव गांधी नगर कळमना परिसरात बाबा रघुनाथ स्वामी हायस्कूल मध्ये गांधी सप्ताह अंतर्गत अनेक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्याने नुकत्याच झालेल्या 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर 2022 रोजी गांधी सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्याने नवरात्रात रास गरबांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बऱ्याच वर्गातील मुलांनी विविध गाण्यांवर गरबा सादर केला. शाळेतील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी नृत्यांचा मोठ्या आनंदाने स्वागत केले. अशा प्रकारे बाबा रघुनाथस्वामी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी एक संस्कारक्षम शाळा आहे. या गांधी सप्ताह अंतर्गत चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, अशा विविध स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. यासर्व स्पर्धेचे संचालन सांस्कृतिक प्रमुख गुरुदास गहरुले यांनी केले तर आभार कुमारी रिना कांबळे हिने मानले. व त्यांच्या खांद्याला खांदा लावून वर्ग शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन कार्यक्रम साजरा केला. सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक मा. हरिश्चंद्र नागोसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.