ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने तीन कुटुंबांवर टाकला बहिष्कार?

35
विदर्भ वतन वृत्तपत्र /न्यूज पोर्टल :  तूमसर

तीन कुटुंबावर ग्रामवासीयानी व ग्रामपंचायतीच्या कमेटिने बहिष्कार टाकला
विदर्भ वतन वृत्तपत्र / न्युज पोर्टल : भंडारा
तुमसर : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले़ या ७५ वर्षांमध्ये सर्वच स्तरावर विकासात्मक बदल पहायला मिळाले़ समाजजीवन उंचावले शिवाय देशाची वाटचाल महाशक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे़. असे असतांना सर्वधर्म समानतेचा नारा देत समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचे सामर्थ्य व प्रगत बुद्धीमत्ता असलेल्या देशातील एका भागात लोकशाही प्रबळ कुटुंबावर समाजाने बहिष्कार टाकणे ही बाब या सर्व प्रवासावर व कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे़.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर भागात मागील एका वर्षापासून श्यामकला शामराव उईके व त्या परिवारातील सदस्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला़ संपुर्ण माहितीनुसार अतिक्रमणची जागा ग्रामपंचायत पिटेसूर यांनी हटवली होती़ सरपंच व उपसरपंच यांनी संगमत करून अतिक्रमण असलेली जमीन हिसकावल्यामुळे श्यामकला उईके यांचे घर तोडून विस्कळीत केले व त्यांच्या परिवाराला बेघर करून त्यांच्यावर बहिष्कार टाकला़ पोलीस स्टेशन आंधळगाव येथे यासंदर्भात तक्रार केली होती मात्र, अजूनही कारवाई झालेली नाही़.
त्यांना अगोदर दुकानातून जीवनावश्यक साहित्य व इतर वस्तु विकत मिळत नव्हत्या मात्र पोलिसांच्या मध्यस्तीनंतर सामान देण्यास सुरुवात केली़ तसेच गावातील एकाही व्यक्तीला बोलण्यास बंदी ठेवली होती़ जर गावातील एखादी व्यक्ती त्यांच्याशी बोलले तर पाच हजार रुपये दंड व एक बकरा असा दंड असे ठरविण्यात आले़ सरपंच व उपसरपंच गावातील ग्रामपंचायतीने मिळून गावातील लोकांवर दंड ठेवला होता़ कुटुंबावर सुरू असलेला हा सामाजिक आघात ते शांतपणे सहन करीत होते़ यासर्व घटनेने परिवाराला मानसिक व शारीरिक त्रास ही सहन करावा लागला़.

या सर्व घटनेला एक वर्ष पुर्ण झाले़ त्यात त्यांच्या गटातील महिला सुनीता प्रभुदास पुसाम ही त्यांच्याकडे आली होती़ पिडीत परिवारातील सदस्य आस्था स्वयंसहायता महिला समुदायाची अध्यक्ष असल्यामुळे विनंता नरेंद्र भलावी या महिलेकडे ठराव व चेक भरण्यासाठी आल्या होत्या़ सुनिता पूसाम या महिला त्यांच्या घरी गेल्या असता उपसरपंच व ग्रामपंचायतीने मिळून गावातील लोकांना गोळा केले व रात्रीचे नऊच्या दरम्यान समाज मंदिर गायमुख येथे बैठक घेण्यात आली़. तू त्या ठिकाणी त्याच्या घरी का गेली असे म्हणून सुनिता पूसाम यांच्या घरावर बहिष्कार टाकला़ त्या बैठकीमध्ये श्यामकला उईके यांनी माझ्या घरावर बहिष्कार का टाकला? असा प्रश्न विचारला असता काही ग्रामस्थ मारण्यासाठी धावले तसेच आम्हाला तो अधिकार आहे बहिष्कार टाकण्याचा असा दम दिला़ तसेच उपसरपंचांनी सुनीता पुसाम यांना अपशब्दात शिविगाळ केली शिवाय विनंता भलावी यांनाही अपशब्द वापरले़ या घटनेनंतर हवालदिल झालेल्या सुनिता पुसाम, शामकला उईके, विनंता भलावी या तिघांनी मिळून पोलीस स्टेशनला आंधळगाव येथे तक्रार केली़ तक्रार देऊन सुद्धा कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही़ तरी शासनाने या प्रकरणात दुर्लक्ष न करता घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पिडीत परिवारांना न्याय द्यावा तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पिडीत कुटुंबांच्यावतीने करण्यात आली आहे़