३ ऑक्टोबर ला विविध सामाजिक संघटनांचा विराट आक्रोश मोर्चा

67
 विदर्भ वतन वृत्तपत्र /न्यूज पोर्टल : नागपूर
     आरक्षण हक्क कृती समिती व विविध ओबीसी एससी/ एसटी / व्हिजे एनटी / एसबीसी / minorites आणि आंबेडकराईट संघटनाद्वारा केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाही हुकुमशाही विरोधात आणि संविधानिक हक्कांसाठी सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक नागपूर येथे विराट जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.
      देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. संविधानाची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे दलित आदिवासी अल्पसंख्याकांचे न्याय हक्क डावलले जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश आहे. म्हणून न्याय हक्कांसाठी तसेच नवीन शैक्षणिक धोरण, मागासवर्गीय विरोधी असल्याने ते रद्द करावे. पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे. खाजगीकरण बंद करा. विद्यार्थ्यांना महागाईनुसार शिष्यवृत्ती लागू करा. जुनी पेन्शन योजना लागू करा. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. ओबीसी भटके विमुक्तांना क्रिमिलियरची अट रद्द करावी. बाल्कीस बानो व इंदर मेगवाल यांना न्याय मिळालाच पाहिजे. 4.5 लाख रिक्त पदांचा अनुशेष भरण्यात यावा. या मागण्यांसाठी आणि देशात धर्मांधता वाढली असून धर्मनिरपेक्ष संकल्पना मोडीत निघाली आहे. लोकशाही धोक्यात आहे व मनुस्मृती पुन्हा लादण्याचे प्रयत्न होत आहे. यासाठी जनते मध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता 3 ऑक्टोबर चा विराट जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने सामील व्हावे. असे आवाहन कॉस्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे, प्रा. प्रदीप आगलावे प्रा. राहुल मून इंजि. सुषमा भड, प्रा. जावेद पाशा, प्रा.एम.एच. वानखेडे, प्रा. रमेश पिसे आणि छाया खोब्रागडे यांनी एका पत्रकाद्वारा केले आहे.
३ ऑक्टोबर २०२२ ला सकाळी ११ वाजता निघणाऱ्या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.