आंदोलन करून गावाचा विकास होणार नाही

48

विदर्भ वतन वृत्तपत्र / न्युज पोर्टल : भंडारा

ग्राम रोजगार सेवक संघटना जिल्हा शाखा भंडारा यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2022 ला माननीय श्री संदीप भाऊ टाले उपाध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा तसेच माननीय सावंत मॅडम उपमुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा यांना ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन दिलेले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 27 सप्टेंबर 2022 ला जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष माननीय श्री संदीप भाऊ टाले यांचे अध्यक्षतेखाली माननीय सावंत मॅडम उपमुख्य कार्यकाल अधिकारी नरेगा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ग्राम रोजगार सेवकांच्या विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली. ग्राम रोजगार सेवकांना शासन निर्णय 8 मार्च 2021 च्या निर्णयानुसार मार्च 2022 चे मानधन अजून पर्यंत मिळालेले नाही तसेच शासन निर्णयानुसार ग्राम रोजगार सेवकांच्या वैयक्तिक खात्यावर मानधन जमा होत नाही. सन 2017 पासून ते 2021 पर्यंत चे अल्पोहार व प्रवास भत्ता अजून पर्यंत मिळालेला नाही एन एम एम एस यापद्वारे हजेरी घेण्यास ग्राम रोजगार सेवक तयार असून त्यांना अँड्रॉइड मोबाईल व नेट पॅक पुरविण्यात यावा त्याचप्रमाणे शिशी करतानी ग्रामपंचायतला झिरो पॉईंट 5 टक्के निधी देण्यात यावी अशाप्रकारे विविध विषयावरती चर्चा करण्यात आली चर्चा सकारात्मक झाली असून माननीय श्री संदीप भाऊ टाले तसेच माननीय सावंत मॅडम उपमुख्यकारपणाअधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी आपण 2 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन करणार असून ते आंदोलन करण्यात येऊ नये आठ ते दहा दिवसांमध्ये आपल्या समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन दिलेले आहे त्यामुळे 2 ऑक्टोंबर 2022 पासून ग्राम रोजगार सेवकांचे बेमुदत आंदोलन पुढे ढकलण्यात येत आहे. तर दिनांक 10 ऑक्टोंबर पर्यंत ग्राम रोजगार सेवकांच्या समस्या दूर झाल्या नाही तर मात्र ग्राम रोजगार सेवक संपावर जाणार आहेत आणि काम बंद आंदोलन करून गावाच्या विकास होनार नाही तरी शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी
त्यावेळी चर्चा करताना ग्राम रोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सेवकराम नाग फासे, सचिव रमेश बसणे कार्याध्यक्ष सोविंद हटकर उपाध्यक्ष तुळशीराम बोकडे संघटक होमदेव आकरे मुकेश जगनाडे प्रसिद्धी प्रमुख डाकराम निसार सहसचिव शिवचरण खेत्रे कोषाध्यक्ष दिगंबर शामकुवर साकोली तालुका अध्यक्ष श्री टेंभुर्णे तसेच सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य चर्चेला उपस्थित होते.माननीय श्री संदीप भाऊ टाले उपाध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा यांनी ग्राम रोजगार सेवकांची सभा बोलावली त्यामुळे ग्राम रोजगार सेवक संघटनेचे सचिव रमेश बशीने व जिल्हाध्यक्ष सेवकराम नाग फासे यांनी उपाध्यक्ष महोदयाचे आभार मानले.