नागपूरात संविधान चौकात 2 ऑक्टोबर ला आंदोलन

54

विदर्भ वतन वृत्तपत्र / न्युज पोर्टल : नागपूर

महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील एकुण १३ लाख लिपिकांचे समान काम, समान वेतन आणि समान पदांचे टप्पे यासाठी महाराष्ट्रातील लिपिकांनी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक वर्गीय हक्क परिषदेमार्फत वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. तसेच शासन स्तरावर निवेदने दिली, आढावा बैठका झाल्यात. तत्कालीन राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांचे समान काम, समान वेतन, आणि समान पदोन्नती टप्पे यासाठी शासन परिपत्रक दि.०७.०७.२०२१ नुसार समिती गठीत करण्यात आली होती. दरम्यान समितीने सामान्य प्रशासन विभागात तसा अहवाल दिला व त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने वरील शासनाचे २३.०५.२०२२ चे परिपत्रकान्वये सर्व विभागातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागास दिनांक ३१.०८.२०२२ अखेर तसे प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश दिले आहे. परंतु आज अखेर कार्यवाही झाली नाही. तसेच या नविन पेन्शन योजना रदद करुन सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना १९८२ ची लागू करणे, समान काम, समान वेतन व समान पदनाम, पदोन्नतीचे टप्पे व समान अधीकार, सर्व कर्मचाऱ्यांना सुधारीत आश्वासित प्रगती योजनेतील १०, २० व ३० चा लाभ लागू करणे. (उदा.शिक्षकेत्तर कर्मचारी /आश्रमशाळा / महाराष्ट्र जिवन प्राधिकरण) लिपीक संवर्गाची पदे कंत्राटी निर्माण न करता ती स्थायी स्वरुपाची निर्माण करुन रिक्त पदे तात्काळ भरावी. तसेच पदोन्नती धारकास वरिष्ठ पदाचे किमान मुळ वेतनासाठी दि. २२.०४.२००९ च्या अधिसुचनेत सुधारणा करणे. तसेच लिपिकांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकण्यात यावी. कॅशलेस वैद्यकीय सुविधा व लिपिकांना नियमित प्रशिक्षण देण्यात यावे. इत्यादी लिपिका संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी सत्याग्रह आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात करण्यात येत आहे. तसेच नागपूर शहरातील संविधान चौक येथे 2 ऑक्टोबर रोजी 12 ते 3 या दरम्यान आंदोलन करणार असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.